५ सामान्य चुका ज्या लोकं पैशाबाबत करतात | Common 5 Mistakes in Saving & Investment | Aarthikgappa
पैशाचं योग्य नियोजन करणं म्हणजे फक्त जास्त कमावणं नव्हे – तर कमावलेले पैसे, शहाणपणानं वापरणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे...!!!
या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत अशाच ५ सामान्य चुका ज्या लोकं ‘saving’ आणि ‘investment’ करताना करतात.
१. उदिष्ट न ठरवता बचत सुरू करणे (No Goal Based Investing/Saving)
अनेक लोक बचत तर करतात, परंतु ते हे का करतात हेच त्यांना माहीत नसत!
तुम्हाला घर विकत घ्यायच आहे? की, रिटायरमेंट साठी पैसे साठवायचे आहेत?
✅ उपाय:
उदिष्ट ठरवा.. आणि मगच बचत सुरू करा! तसेच आपल्या दैनंदिन खर्चाचा लेखा जोखा एका डायरी, Google Sheet किंवा बजेटिंग अॅप मध्ये लिहून ठेवा. ही छोटी पण प्रभावी सवय आहे.
२. सर्व पैसे एकाच जागी गुंतवणे (Putting all Money in One Basket)
आजूबाजूचे लोक फिक्स डिपॉजिट सांगतात, कोणी म्यूचुअल फंड तर कोणी सांगत की सोन्यात गुंतवणुक करा..!
पण तुम्ही कधी विचार केलात का? - की ही गुंतवणुक माझ्या गरजांना योग्य आहे का??
✅ उपाय:
Diversify करा..! म्हणजे, जोखीम कमी व जास्त फायदा.!!
३. विमा व इमर्जनसी फंड कडे दुर्लक्ष (Ignoring Insurance & Emergency Fund)
प्रत्येक इमर्जनसी जस की, अचानक येणारा मेडिकल खर्च, नोकरी जान, इत्यादी..
या घटना, आपल्या आयुष्यभराची बचत संपवून टाकतात .
✅ उपाय:
आपल्या गरजेनुसार एक चांगला टर्म प्लॅन (Term Insurance) व हेल्थ इन्शुरेंस (Health Insurance) काढा..! व कमीत कमी सहा महिन्यांचा खर्च इमर्जनसी फंड म्हणून बाजूला ठेवा, हे कठीण परिस्थित तुमच सुरक्षा कवच होईल.!!
४. इतरांच ऐकून गुंतवणुक करणे (Follow someone's advice blindly)
"माझ्या मित्राने सांगितले, म्हणून मी पैसे टाकले" असे आपण बऱ्याचदा ऐकतो..! परंतु असे केल्याने तोटा देखील होऊ शकतो!
हे पैसे तुमचे आहेत.., मग हा निर्णय पण तुमचाच असला पाहिजे..!!
✅ उपाय:
नेहमी प्रत्येक पर्यायाची माहिती घ्या, समजून घ्या.. आणि मगच गुंतवणुक करा.!!
५. इन्शुरेंस आणि गुंतवणुक एकत्र करणे (Combine Insurance & Investments together)
"इन्शुरेंस व गुंतवणुक ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत "
✅ उपाय:
Keep Your Insurance and Investments Separate.!!
या विषयावर अधिक सविस्तर माहिती खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये दिली आहे – नक्की बघा!
निष्कर्ष | Conclusion
कमेंट करा आणि हा ब्लॉग तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की share करा!
👉 Subscribe करा Aarthik Gappa YouTube Channel:
https://www.youtube.com/@aarthikgappa
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Your thoughts are welcome! Keep it polite 😊